पनवेल मतदार संघात विविध ठिकाणी घुमला मतदानाचा जागर



रायगड अलिबाग दि.06 (जिमाका) :- भारत सरकार, माहिती व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो,   गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने  "विधानसभा  निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी   पथनाट्यातून मतदार जनजागृती केली.
या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करीत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करीत आहेत.  या पथनाट्य दौऱ्यामध्ये कलाकार म्हूणन प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, स्वप्नाली थळे आदी कलाकार सहभागी झाले. चित्ररथाच्या माध्यमातून पनवेल मधील तहसील कार्यालय, शिवाजी महाराज चौक, सोसायटी नाका पनवेल, रेल्वे स्टेशन, कोहिनुर टेक्निकल, डॉ. आंबेडकर भवन शेजारी, टेम्बोले नाका, शिवा कॉम्प्लेक्स न्यू पनवेल, बस स्टॅन्ड, खांदा कॉलनी, मानसरोवर, कामोठे सेक्टर 35, कामोठे पोलीस स्टेशन,  कामोठे फ्लायओव्हर, कोपरगाव, लिटिल वर्ड मॉल,  खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस स्टॅन्ड आदी ठिकाणी कार्यक्रम केले.
‘माझं मत, माझा महाराष्ट्र’ या माध्यमातून मतदान हा आपला पवित्र हक्क आहे. मतदान अमुल्य दान, दान कोणी  विकतं का ? मतदान हा मूलभूत  हक्क आहे, तो  बजावणं  हे  आपलं  कर्तव्य  आहे. १८ वर्षावरील व्यक्ति  ही  सज्ञान  असते, स्वत निर्णय  घेऊ  शकते,  कुठल्याही  अमिषाला  बळी पडू नका. मतदान ही  गुप्त  प्रक्रिया आहे, तूम्ही  कोणाला मत दिले, हे तूमच्याशिवाय  कोणालाच  कळत नाही. अशा विविध मुद्यांवर आधारित नाटुकली सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड