आचारसंहिता भंगाविषयीच्या तक्रारींसाठी सी-व्हिजिल ॲप



रायगड अलिबाग दि.06 (जिमाका) :- विधानसभा निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विधानसभा निवडणूकीदरम्यान कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्यास ही बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आणून देता यावी, तसेच नागरीकांना आचारसंहितेबाबत त्यांची असणारी तक्रारी नोंदविता यावी. यासाठी सी-व्हिजिल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांची आचासंहितेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी ती सी-व्हिजिल ॲपवर नोंदवावी त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जनतेला आचारसंहिता भंग विषयक तक्रारी करावयाची असल्यास त्यांनी सी-व्हिजिल ॲपवर कराव्यात. याकरीता नागरीकांना प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून सी-व्हिजिल ॲप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. यावर आचारसंहिता भंग होत असल्यास घटनेचा लाईव्ह फोटो, व्हिडीओ टाकून घटनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल, तरी जनतेने विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेबाबत आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी सी-व्हिजिल ॲपचा वापर करावा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक