अलिबाग तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती




रायगड अलिबाग दि.07 :भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी - डॉ. विजय सूर्यवंशी,  उपजिल्हाधिकारी निवडणूक- वैशाली माने, नोडल अधिकारी, स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
जिल्हयात विधानसभा निवडणुक मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदान जनजागृती विषयी चित्ररथ व पथनाटय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
               अलिबाग येथे आज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी - शारदा पोवार, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी- सचिन शेजाळ , यांच्या प्रमुख उपस्थितीत " विधानसभा  निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून अलिबाग  भाजी मार्केट, अलिबाग बस स्टॅन्ड, शिवाजी महाराज पुतळा, ठिकरूळ नाका, काळंबा मंदिर, अलिबाग समुद्र किनारा, जे. एस. एम. कॉलेज, कन्या शाळा ज्युनिअर कॉलेज, मारुती नाका येथे मतदार जनजागृती केली.
           अलिबाग बस स्टॅन्ड येथे उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला. तसेच सर्वांना 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, सुरेखा घुगे - निवडणूक नायब तहसीलदार, सुदर्शन सावंत - व्ही.व्ही. पॅट पथक प्रमुख, जितेंद्र कांबळे - मंडळ अधिकारी, वल्लभ मस्के -तलाठी अलिबाग, ललिता शिर्के - तलाठी वेश्वी, सुरक्षिता थळे -महिला होमगार्ड  यांसह अन्य मान्यवर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.
          या पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करित आहेत. रिजनल आऊटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग, महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग अंतर्गत चित्ररथाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे . या पथनाट्य दौऱ्यामध्ये कलाकार म्हूणन प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, प्रसाद अमृते, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, तुषार राऊळ  आदी कलाकार सहभागी झाले.
 चित्ररथाच्या माध्यमातून स्वीप अंतर्गत माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून मतदान हा आपला पवित्र हक्क आहे. मतदान अमुल्य दान, दान कोणी  विकतं का? मतदान हा मूलभूत  हक्क आहे, तो  बजावणं  हे  आपलं  कर्तव्य  आहे. १८ वर्षावरील व्यक्ती  ही  सज्ञान  असते, स्वत: निर्णय  घेऊ  शकते,  कुठल्याही  अमिषाला  बळी पडू नका. मतदान ही  गुप्त  प्रक्रिया आहे, तुम्ही  कोणाला मत दिले, हे तुमच्या शिवाय  कोणालाच  कळत नाही. अशा विविध मुद्यांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आली. या कार्यक्रमास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक