माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून कर्जत तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार जनजागृती



रायगड अलिबाग दि.10 :- भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी-, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, सुनिल जाधव  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विधानसभा मतदार संघ वैशाली परदेशी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने "विधानसभा  निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर कर्जत विधानसभा मतदार संघात चित्ररथ फिरवून मतदान जागृती केली.
स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दहिवली, कर्जत पोलीस स्टेशन, कपालेश्वर मंदिरा समोर, कर्जत रेल्वे स्टेशन, मच्छीगल्ली, धापया मंदिरा शेजारी, कर्जत नगर परिषदेसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर,  भाजी मार्केट कर्जत, चारफाटा, डिकसल, महेश टॉकीज समोर, नेरळ रेल्वे स्टेशन, नेरळ अंबिका भुवन नाका, नेरळ बस स्थानक,नेरळ मार्केट अशा विविध ठिकाणी मतदार जनजागृती केली. यावेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, जिल्हा युवा पुरस्कारार्थी तथा पाणी फाऊंडेशनचे प्रतिनिधी आशिष लाड यांसह अन्य मान्यवर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.
चित्ररथाच्या माध्यमातून स्वीप अंतर्गत माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून मतदान हा आपला पवित्र हक्क आहे. मतदान अमुल्य दान, दान कोणी  विकतं का? मतदान हा मूलभूत  हक्क आहे, तो  बजावणं  हे  आपलं  कर्तव्य  आहे.१८ वर्षावरील व्यक्ति  ही  सज्ञान  असते, स्वत निर्णय  घेऊ  शकते,  कुठल्याही  अमिषाला  बळी पडू नका. मतदान ही गुप्त प्रक्रिया आहे, तूम्ही कोणाला मत दिले, हे तूमच्याशिवाय  कोणालाच  कळत नाही. अशा विविध मुद्यांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड