190-उरण विधानसभा मतदारसंघाच्या खर्च ताळमेळ बैठका




रायगड अलिबाग दि.07 :  190-उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना कळविण्यात येते की, श्री.के.सुनिल कुमार नायर, IRS यांची भारत निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशानुसार 190-उरण विधानसभा मतदार संघाकरिता खर्च निरीक्षक (Expenditure Observer) म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 190-उरण या विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचा व राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्च बाबतचा ताळमेळ घेण्यासाठी बैठकीचा दिनांक व ठिकाण निश्चित केलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
190-उरण मध्ये 10 ऑक्टोंबरला  पहिली खर्च ताळमेळ बैठक, 14  ऑक्टोंबरला दुसरी खर्च ताळमेळ बैठक आणि  18 ऑक्टोंबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक. या सर्व बैठका  सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी 190-उरण विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय, रा.जि.प.मराठी शाळा, जासई ता.उरण येथे होणार आहेत. तरी 190-उरण विधानसभा मतदार संघातील सर्व नामनिर्देशित उमेदवारांना व संबंधित राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की सदर बैठकीसाठी शॅडो रजिस्टर व इतर सर्व खर्चाच्या संबंधित कागदपत्रासह वरील दिनांकास व नमूद ठिकाणी उपस्थित राहावे असे  निवडणूक निर्णय अधिकारी 190-उरण विधानसभा मतदार संघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक