साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता दि.9 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत




अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- मुंबई शहर-उपनगर, जिल्ह्यातील मातंग समाजातील  मांग, मिनी मादींग, मादींग दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगाया या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी करिता सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
              ज्येष्ठता गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशिट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादीसह दोन प्रतीत पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय, दिनेश यशवंत जोशी, सुयश बंगला, हाऊस क्र.1414 चेंढरे, भगत नगर पाठीमागे, आनंद नगर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे कार्यालयीन वेळ स.10.00 ते सायं.5.30 या पत्त्यावर दि.9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विका महामंडळ (मर्या)  अंगद कांबळे यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक