अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन अवजड वाहतूकीस बंदी



अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :-  आगामी पावसाळयात रेवदंडा पुलास होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळयाच्या (दि.21 जून 2020 ते दि.30 ऑक्टोबर 2020) या कालावधीमध्ये रेवदंडा पुलावरुन होणारी अवजड वाहतूक (12 मॅट्रीक टनापेक्षा जास्त भारवहन असणारी वाहने) पूर्णपणे बंद करुन, तसेच अलिबाग ते वावे ते चौल-रेवदंडा, सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावरुन होणारी अवजड वाहतूक बंद करुन ही अवजड वाहतूक अलिबाग ते वडखळ, वडखळ ते रोहा, रोहा ते साळाव या मार्गे करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश जारी केले आहेत. 
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक