पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित


वृत्त क्रमांक :- 1008                                                दिनांक :- 22 जुलै 2020


 अलिबाग, जि.रायगड, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती ठिकाणे करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :-
मौजे करंजाडे, ता.पनवेल येथील वंदना विनोद खंदारे यांचे घर, गिमीराज इम्पेरियल को.ऑ.हौ.सो.प्लॉट नं.122 ए, सेक्टर-06, दुसरा मजला, करंजाडे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील दत्तू महादेव कोडक यांचे घर, निंबेश्वर आंगण, बी-विंग, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-डी-विंग, पश्चिमेस-गंगाधाम, दक्षिणेस-ए-विंग, उत्तरेस-स्वानंद भूमी) हा परिसर.
मौजे पारगांव, ता.पनवेल येथील स्मिता कमलाकर चौधरी, यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-नितीन बाळाराम पाटील यांचे घर, पश्चिमेस-वसंत विश्वनाथ चौधरी यांचे, दक्षिणेस-किशोर विठ्ठल पाटील यांचे घर, उत्तरेस-वसंत नारायण मेहेर कायम बंद घर) हा परिसर.
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील सागर संतोष आडसुळे यांचे घर, कार्तिकेय गार्डन, मालेवाडी, सुकापूर, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-डी-विंग, पश्चिमेस-किराणा दुकान, दक्षिणेस-परि टेलर्स, उत्तरेस-मोकळे मैदान) हा परिसर.
मौजे ओवळे ता.पनवेल येथील लालसूर्य मारुती म्हात्रे यांचे घर, मु.ओवळे, पो.पारगांव, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-शांतीलाल कान्हा घरत यांचे घर, पश्चिमेस-राम हरी म्हात्रे यांचे घर, दक्षिणेस-त्रिंबक दत्तू म्हात्रे यांचे घर, उत्तरेस-धर्मुबाई दामोदर गायकवाड यांचे घर) हा परिसर.
मौजे देवद गांव, ता.पनवेल येथील सुदिप सुभाष शिंदे यांचे घर, सनातन संकुल, डी-29 रो हाऊस, देवद गांव, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे दापोली, ता.पनवेल येथील तारामती भुतेकर यांचे घर, मु.दापोली, पो.पारगांव, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बबन अंबाजी म्हात्रे यांचे घर, पश्चिमेस-हायस्कूल, दक्षिणेस-अमित गुरुनाथ डाऊर यांचे घर, उत्तरेस-हायस्कूल) हा परिसर.
मौजे उलवे ता.पनवेल येथील दिलीप शामभार्या सालीयन यांचे घर, शगुन पॅराडाईज, को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.61-ए, सेक्टर-5, सहावा मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे सुकापूर, ता.पनवेल येथील किशोर हरीभाऊ पाटील यांचे घर, अस्मिता बिल्डींग, युगांतर कॉम्पलेक्स, सुकापूर ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-अतिश बिल्डींग युगांतर कॉम्पलेक्स, पश्चिमेस-वॉल कंपाऊंड, दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-मेन गेट व रोड) हा परिसर.
मौजे आदई ता.पनवेल येथील विद्या तुकाराम पानसकर यांचे घर, ओमकार पुरम त्रिकुट, आदई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-मोकळे मैदान, पश्चिमेस-राधे सोसायटी, दक्षिणेस-आम्रपाली सोसायटी, उत्तरेस-करजू आई मंदिर) हा परिसर.
मौजे साई ता.पनवेल येथील हरिश्चंद्र विठ्ठल भोईर यांचे घर मु.पो.साई, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बंद दुकान, पश्चिमेस-बंद घर, दक्षिणेस-दत्तात्रेय हिराजी म्हात्रे यांचे घर,उत्तरेस-बुधीबाई चांगा मोकल यांचे घर) हा परिसर.
मौजे उलवे, ता.पनवेल येथील किशोर प्रेमजी वाधवान यांचे घर, गुरु आशिष बिल्डींग, प्लॉट नं.103, सेक्टर-20, तळ मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे उलवे ता.पनवेल येथील सावळा हिरामण घोडके यांचे घर स्काय को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.92, सेक्टर-9, दहावा मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे वाजे ता.पनवेल येथील बाळू सुदाम भगत यांचे घर वॉटर्स एज को.ऑप.हौ.सो. ए-विंग, वाजे, पो.वाजे, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-शेती, पश्चिमेस-ई-विंग, दक्षिणेस-वॉचमन केबीन, उत्तरेस-बी-विंग) हा परिसर.
मौजे देवद गाव, ता.पनवेल येथील पंकज रमाकांत पोतदार यांचे घर, पुष्प नारायण कॉम्प्लेक्स को.ऑप.हौ.सो. बिल्डींग नं.15 देवद गाव, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे डेरवली, ता.पनवेल येथील जावेद रझाक संदे यांचे घर गोकुल कॉम्प्लेक्स बिल्डींग नं.6, डेरवली, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे पेठ गाव ता.पनवेल ज्ञानेश्वर दत्ता सुरते यांचे घर मु.पेठ गाव, विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ पो.कोळखे पेठ, ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-दशरथ सुरते यांचे घर, पश्चिमेस-जितेंद्र डाकी यांचे घर, दक्षिणेस-ज्ञानेश्वर सुरते यांची चाळ, उत्तरेस-उमेश सुरते यांचे घर) हा परिसर.
मौजे कोळखे पेठ, ता.पनवेल येथील राजेंद्रकुमार ज्योतिराम सानप यांचे घर समाधान को.ऑप. हौ.सो. बी-विंग, कोळखे, पेठ ता.पनवेल हा इमारतीचा भाग
मौजे शिरढोण, ता.पनवेल येथील विलास अनंत ठकेकर यांचे घर (चर्तुसीमा-पूर्वेस-चिकरचे दुकान, पश्चिमेस-भावना अनंत महाडीक यांचे घर, दक्षिणेस-नारायण राघो मुकादम यांचे घर, उत्तरेस-शेती) हा परिसर.
मौजे आदई ता.पनवेल येथील जयदिप सुभाष माने यांचे घर, अष्टविनायक फेज-2, बी-20, आदई ता.पनवेल (चर्तुसीमा-पूर्वेस-बी-18, पश्चिमेस-बी-12, दक्षिणेस-मोकळ मैदान, उत्तरेस-बी-10) हा परिसर.
मौजे विचुंबे ता.पनवेल येथील रोहित सुरेश सकपाळ यांचे घर, संतोष धोंडू सुरते बिल्डींग, घर क्रमांक 954, विचुंबे ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
मौजे उलवे ता.पनवेल येथील संदिप देविदास कदम यांचे घर के.के.इन्क्लाव को.ऑप.हौ.सो. प्लॉट नं.187, सेक्टर-19, सहावा मजला, उलवे, ता.पनवेल हा इमारतीचा भाग.
               ही क्षेत्रे करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री. दत्तू नवले यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पनवेल श्री.दत्तू नवले यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक