पेण येथे शनिवारी रोजगार मेळावा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व डॉ.पतंगराव कदम आर्टस अँड कॉमर्स कॉलेज पेण यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ.पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेण कोर्टाजवळ, पेण येथे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यांना 8वी, 10वी, 12 वी, पदवी, पदवीधर, आयटीआय, फिटर, सी.एन.सी प्रोग्रॅमिंग, मशिनिस्ट, डिप्लोमा इन सी.एन.सी प्रोग्रॅमिंग बी.एस.सी. केमेस्ट्री अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.
या मेळाव्यात मुलाखतीस येतांना  उमेदवाराने स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह डॉ.पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेण, कोर्टाजवळ,ता. पेण जि.रायगड येथे  उपस्थित रहावे.
मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://rojgar.mahaswyam.in या वेबपोर्टलवर भेट देवून नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी महारोजगार या वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत संकेतस्थळावर आपला जूना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे. आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करुन  जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन ROJGAR MELAVA PEN या ऑप्शनमध्ये जावून पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी हेल्पलाईन 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अलिबाग रायगड यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक