दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत “सामाजिक न्याय पर्व” कार्यक्रमाचे आयोजन -सहाय्यक आयुक्त सुनील जाधव

 

अलिबाग, दि.25 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालय येथे शनिवार, दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली आहे.

शनिवार, दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन, संविधान वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते हिराकोट तलाव या मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांमार्फत महाड येथील चवदार तळे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांवर आधारित यशोगाथा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. जिल्ह्यातील समतादूतमार्फत विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत प्रचार-प्रसार केला जाणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता संवाद उपक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी समिती यांच्याकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे.. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय वसतिगृह तसेच आश्रमशाळेमधील प्राचार्य, गृहपाल व मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून स्पर्धा आयोजित कराव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक