भारतीय मानकांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यशाळा संपन्न

 

अलिबाग, दि.22 (जिमाका):- भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अन्वये भारतीय मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या क्षमतावर्धन तसेच केंद्र शासनामार्फत गुणवत्तेबाबत निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी इ. संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात भारतीय मानक ब्युरोचे वैज्ञानिक टी.अर्जन व आशिष वाकले यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भारतीय मानक ब्युरो संदर्भात प्रशिक्षण दिले. तसेच रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाव्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालयांना यावेळी ऑनलाईन पध्दतीने सहभागी करुन प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणास रायगड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक