"संविधान दिनी” पर्यटन संचालनालयामार्फत “चवदार तळे” महाड येथे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट” शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

टूर सर्किटची सुवर्णसंधी

  

अलिबाग, दि.25 (जिमाका):- दरवर्षी दि.26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी संविधान दिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागाच्या सूचनेनुसार पर्यटन संचालनालयाद्वारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या विभागनिहाय तयार करण्यात आली आहेत. या टूर सर्किटच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. या दूर सर्किटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे शनिवार, दि.26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट चा औपचारिक शुभारंभ कार्यक्रम चवदार तळे, महाड येथे पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबई आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या टूर सर्किटच्या माहितीपत्रकाचा औपचारिक प्रकाशन समारंभ स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी व पर्यटन सहभागीदार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित सांस्कृतिक कार्यक्रम, बुध्दिस्ट टूर सर्किटचे उद्घाटन व टूर सर्किटची उपस्थितांना माहिती करून देणे, तसेच कार्यक्रमादरम्यान मुंबई येथील मुख्य कार्यक्रम थेट प्रक्षेपित करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी महाड येथील चवदार तळे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक