“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

 

 

अलिबाग,दि.06(जिमाका) :- शासन आपल्या दारी उपक्रमाची रायगड जिल्हा परिषदमार्फत प्रभावी अंमबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळवून देण्यात येत आहेत. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्व. ना.ना. पाटील सभागृहात बुधवारी (दि.5जुलै) रोजी प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिला व बाल कल्याण, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, ग्रामपंचयत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी विभागातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना तालुकास्तरावर प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महिला व बालकल्याण विभाग निर्मला कुचिक यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक