संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत लाभ घेण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव सादर करावेत --जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर

 

 

अलिबाग,दि.05(जिमाका):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (एनएसएफडीसी) मुदती कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुऋण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते.

एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झाला आहे. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, रायगड येथे अर्ज केले होते त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेवून कर्जाचे वितरण करावयाचे आहे.

तरी ज्या अर्जदारांच्या कर्ज प्रस्तावात त्रुटी असतील त्यांनी त्रुटींची पूर्तता करुन आपले कर्ज प्रस्ताव तात्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, रायगड, मधुनील, हाउस नं-15, रायवाडी कॉम्प्लेक्स, रूम नं-105, पारिजात गृहनिर्माण संस्था मर्या.पहिला मजला, श्रीबाग नं.2, चेंढरे, ता.अलिबाग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण आहीर यांनी केले  आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक