तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी इच्छुक खेळाडूंनी नामांकने,प्रस्ताव सादर करावेत


 

अलिबाग,दि.06(जिमाका) :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, केंद्र शासनाने दि.23 जून 2023 रोजीच्या पत्रान्वये सन- 2022 मधील तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) वितरित करण्याकरिता नामांकनाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

 तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन-2022 करिता केंद्र शासनास शिफारस करण्यासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील म्हणजे सन-2020, 2021, 2022 मधील असणे आवश्यक आहे, साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे, खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट (Outstanding achivements)असणे आवश्यक आहे, याप्रमाणे खेळाडूंची कामगिरी, कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन-2022 करिता प्राप्‍त होणारी नामांकने, प्रस्ताव दि. 15 जून ते दि.14 जुलै 2023 या कालावधीतच केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार इच्छुक खेळाडूंनी आपले नामांकन, प्रस्ताव संचालनालयाच्या dsysdesk१०@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावेत, असे सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा सुधीर मोरे यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड