विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळाडूंकरिता नवीन प्रवेश इच्छूक खेळांडूनी अर्ज करावेत

 

 

रायगड (जिमाका),दि.02:- सन 2024-25 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 09 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50% ) प्रक्रियेअंतर्गत खालीदिलेल्या निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार असून खेळांडूनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,रायगड  राजेंद्र अतनुर  यांनी केले आहे.

महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसंतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यशिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. या प्रवेश प्रक्रीयेसाठी पुढीलप्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.

राज्यात पुणेकोल्हापूरठाणेअमरावतीअकोलानाशिकनागपूरऔरंगाबादगडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. या  क्रीडा प्रबोधिनी मध्ये ज्युदोजिम्नॅस्टीक्सहॉकीशुटींगफुटबॉलजलतरणअॅथलेटिक्सकुस्तीबॅडमिंटनआर्चरीहॅन्डबॉलटेबल टेनिसवेटलिफ्टिंगट्रायथलॉनसायकलिंगबॉक्सींग अशा 17 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.

सरळ प्रवेश प्रक्रिया:- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची  चाचणी तज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चत केला जातो .

खेळ निहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळत राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणी चे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.

वैद्यकीय चाचणी :- उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पाथकाव्दरे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनी मध्ये शाररीक दृष्ट्या सुदृढ खेळाडूची निवड अंतिम करण्यात येते.

निकषामध्ये पात्र खेळाडूंनी जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होण्याकरिता  नावे नोंदणी दि.  05 जुलै 2024 पूर्वी जिल्हा किडा अधिकारी कार्यलयरायगड येथे विहीत नमुन्यातील अर्जासह करण्यात यावी.  खेळाडूचे नावजिल्हाखेळ प्रकारजन्मदिनांक (जन्मतारखेचा दाखलाबोनाफाईड सर्टिफिकेट व आधारकार्ड)वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र (राज्य/ राष्ट्रीय स्पर्धा प्रमाणपत्रे )याबाबत माहिती सह नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम ता.अलिबाग, जि. रायगड येथे करण्यात यावी.

मुंबई विभागांतर्गत जिल्ह्यातून प्रवेशिकानुसार खेळाडूंची खेळनिहाय चाचण्या घेण्यात येतील. विभागस्तरीय क्रीडा कौशल्य चाचणीचे आयोजन दि.08 ते 09 जुलै 2024 दरम्यान करण्यात येतील व विभागस्तरावरून निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचा प्रवेश अर्ज राज्यस्तरावरील चाचणीसाठी पाठविण्यात येतील.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड