रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन गणेशोत्सवासाठी कोकणात येताना पर्यायी मार्ग वापरा-वाहतूकीची कोंडी टाळा

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :-01 सप्टेंबर  2016                                                   वृत्त्‍ क्र.571 
                                  रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन
गणेशोत्सवासाठी कोकणात येताना
पर्यायी मार्ग वापरा-वाहतूकीची कोंडी टाळा


              अलिबाग दि.1 : गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण असून यासाठी मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे आदि भागात असलेल्या कोकणवासी कोकणात सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी हमखास येतात.   यामुळे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहनांची संख्या वाढून बऱ्याच वेळा  महामार्गावर वाहतूक कोंडी होते.  त्यामुळे अशी होणारी  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश भक्तांनी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येताना पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
 मुंबई-गोवा या महामार्गाव्यतिरिक्त 1) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग- मुंबई-खालापूर पाली-वाकण-माणगांव-महाड,मार्गे 2) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा उंब्रज-पाटण-चिपळूण मार्गे, 3) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-मलकापूर-अंबाघाट मार्गे रत्नागिरी,  4) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली, 5) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली,  6) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी.
रायगड अंतर्गत पर्यायी मार्ग
तसेच अन्य काही पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.  1) खोपोली- पालीफाटा-पाली-वाकण-सुकेळी-महाड 2) खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-कोलाड-महाड 3) खोपोली -पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर-महाड. 4) खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर- करबंळी-ताम्हाणे-मुगवळीफाटा-महाड.  5)  खोपोली-पेण-वडखळ-सुकेळी-महाड.   6) पनवेल-पेण-वडखळ, पेझारी-आय.पी.सी.एल-नागोठणे-वाकण-महाड.7)पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण. ) वाकण-भिसेखिंड-रोहा-कोलाड-महाड. 9) वाकण-भिसेखिंड-रोहा-तांबडी-वाली-तळा-इंदापूर-महाड.10)माणगाव-मोर्बो-दहिवली-गोरेगाव-लोणेरे-महाड. 11) माणगांव-म्हसळा-आंबेत-म्हाप्रळ-मंडणगड,खेड 12) महाड-राजेवाडी, नातूनगर- खेड.
 या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे तसेच वाहतुकीचे नियम पाळावेत.  आवश्यक त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करावी. गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई-गोवा हायवेवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून 6 सेक्टर तयार करण्यात आले असून त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.   1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2016 दरम्यान या काळात वाळू वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. तसेच अवजड वाहनांना बंदी आदेश आहेत. या काळात सुखकर प्रवासासाठी सर्व प्रवाशांनी वाहतूक नियमांचे अचूक पालन करुन  प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले व जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक