गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

दिनांक :- 03 सप्टेंबर  2016                                                          लेख क्र.29
गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

       गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत व्हावा.  वाहतूक कोंडी होऊ, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.  याबाबतची माहिती देणारा लेख..

गणेशोत्सव कोकणात मोठया प्रमाणावर साजरा होतो.  रायगड जिल्ह्यात सार्वजनिक गणपती 276, खासगी 99762, गौरी स्थापना 14647 एवढया गौरी-गणपतीची स्थापना होते.   कोकणात गणेशोत्सवासाठी जाणारे नागरिक रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतात.   हा उत्सव साजरा करण्यासाठी जाताना  नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये.  यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणेला त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या बाबी सुयोग्य पध्दतीने कराव्या यासाठी सुचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी विद्युत अधिकाऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली आहे.  काही बिघाड झाल्यास तो तातडीने दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध केले आहेत.  एस.टी.महामंडळामार्फत राज्यातील विविध आगारातून जादा बसेसे सोडण्यात आल्या आहेत.
ध्वनीक्षेपक वापरास परवानगी
गणेशोत्सव काळात श्रोतगृह, सभागृहे, सामुहिक सुभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांव्यतिरिक्त चार दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून  5सप्टेबर, 6 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि  15 सप्टेंबर 2016 या दिवशी ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नुसार, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजल्यापासून रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
सजावट स्पर्धा
 लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढयात स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा दिला. यास 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शासनाने गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्हयातील गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा.  त्यासाठी मंडळांनी  नोंद करणे आवश्यक आहे.
अवजड वाहनांना बंदी
         1 सप्टेंबर 2016 पासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.   1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2016 पर्यंत रात्रौ 8.00 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (जुना क्रमांक 17) या कालावधीत वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्ण बंद ठेवली आहे. 6 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 8.00 ते रात्रौ 8.00 वाजेदरम्यान सर्व प्रकारची जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू/रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे.

            पाच  दिवसांचे गणपती, गौरी विसर्जन व 7 दिवसांचे गणपती विसर्जनानिमित्त 9 सप्टेंबर रोजी रात्रौ 8.00 पासून ते 12 सप्टेंबर सकाळी 8.00 वाजेपर्यंत होणारी वाळू/रेतीचे ट्रक,ट्रेलर तसेच अवजड वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशा वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच अनंतचतुर्थी गणपती विसर्जनानिमित्त 15 सप्टेंबर सकाळी  8.00 पासून ते  दिनांक 16 सप्टेंबर 2016 रात्रौ 8.00 पर्यंत वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशा अवजड वाहनांच्या वाहतुक बंद करण्यात  आली आहे.           1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2016 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत वाळू/रेतीची वाहतुक पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे.   
जीवनावश्यक वस्तू नेणाऱ्या वाहनांना बंदीमधून सूट
            अवजड वाहनांच्या बंदीमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग/ वाहतूक नियंत्रण
 मुंबई-गोवा या महामार्गाव्यतिरिक्त 1) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग- मुंबई-खालापूर पाली-वाकण-माणगांव-महाड,मार्गे 2) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा उंब्रज-पाटण-चिपळूण मार्गे, 3) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-मलकापूर-अंबाघाट मार्गे रत्नागिरी,  4) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली, 5) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली,  6) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग -मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी.
रायगड अंतर्गत पर्यायी मार्ग
तसेच अन्य काही पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.  1) खोपोली- पालीफाटा-पाली-वाकण-सुकेळी-महाड 2) खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-कोलाड-महाड 3) खोपोली -पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर-महाड. 4) खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर- करबंळी-ताम्हाणे-मुगवळीफाटा-महाड.  5)  खोपोली-पेण-वडखळ-सुकेळी-महाड.   6) पनवेल-पेण-वडखळ, पेझारी-आय.पी.सी.एल-नागोठणे-वाकण-महाड.7)पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण. 8) वाकण-भिसेखिंड-रोहा-कोलाड-महाड. 9) वाकण-भिसेखिंड-रोहा-तांबडी-वाली-तळा-इंदापूर-महाड.10)माणगाव-मोर्बो-दहिवली-गोरेगाव-लोणेरे-महाड. 11) माणगांव-म्हसळा-आंबेत-म्हाप्रळ-मंडणगड,खेड 12) महाड-राजेवाडी, नातूनगर- खेड.
पोलीसयंत्रणा सज्ज
सामाजिक सलोखा राहावा यासाठी ठिकठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग दाखविण्या संदर्भात आवश्यक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. महामार्गावर महत्वाच्या 15 ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात 30 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत.    पोलीस यंत्रणेने आपापल्या हद्दित कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील तसेच उत्सव शांततेत पार पडेल यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महत्वाच्या ठिकाणी नादुरुस्त वाहन रस्त्याच्या बाजूला नेण्यासाठी क्रेन उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहेत.  महामार्गावर हमरापूर फाटा, कांदळेपाडा (रिलायन्स पेट्रोल पंप) वाकण फाटा, नाते खिंड या चार ठिकाणी गणेश भक्तांच्या सुविधेसाठी मदत केंद्रे उभारण्यात  आली आहेत. पोलीस निरीक्षकांमार्फत मोबाईल गस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनीही वाहतूकीचे नियम आणि पोलीस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करुन उत्सव काळात सहकार्य करावे.
0000
                                                           विष्णू काकडे
                                                               माहिती अधिकरी
                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक