अवयव दानासाठी स्वेच्छेने पुढे यावे --डॉ. बी.एस.नागावकर

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30 ऑगस्ट  2016                                                वृत्त क्र.561
अवयव दानासाठी स्वेच्छेने पुढे यावे
                                                               --डॉ. बी.एस.नागावकर


 अलिबाग दि.30 : आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवयव प्रत्यारोपण करता येते. यामुळे एका रुग्णाचा जीव वाचविता येतो.   अवयव दान हे श्रेष्ठ दान असून यामुळे एका व्यक्तीला नवीन जीवन मिळते. अवयव दान हे मृत्यू पश्चात करण्यात येते. यासाठी अवयवदान मोहिमे अंतर्गत फॉर्म भरुन आपल्या नावाची नोंदणी स्वेच्छेने करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागांवकर यांनी यावेळी केले.
            अवयव दानाचे महत्व विषद करण्यासाठी अवयव दान महा अभियानाअंतर्गत अलिबाग येथे केळुस्कर महाविद्यालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.एस.नागावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या व्याख्यानात मार्गदर्शनन करतांना डॉ. नागावकर बोलत होते. यावेळी केळुस्कर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.श्री.जैन, उप प्राचार्य  आशिष घरत उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी,परिचारिका, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थीनी तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक