अवयवदान महा अभियान अवयदात्यांचा सत्कार संपन्न

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 01 सप्टेंबर  2016                                                         वृत्त क्र.572
अवयवदान महा अभियान
अवयदात्यांचा सत्कार संपन्न

 अलिबाग दि.1 : राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत अवयवदान महा अभियान राबविण्यात आले.  रायगड जिल्ह्यात या अभियानांतर्गत  अवयवदान केलेल्या दैनिक लोकमतचे कोकण समन्वयक जयंत धुळप व छायाचित्रकार असराणी  यांच्यासह 11 व्यक्तींचा व अवयवदान केलेल्या 5 व्यक्तींच्या नातेवाईकांचा आज नर्सिंग प्रशिक्षण केंद्र अलिबाग येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.)डॉ.अविनाश गोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
विविध स्पर्धा बक्षिस वितरण
            तसेच या अभियानात जनजागृती व्हावी यासाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.  यात  प्रामुख्याने निबंध स्पर्धेत विजेत्या झालेल्या प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ एक तसेच चित्रकला स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना व उत्तेजनार्थ एक असे चार स्पर्धकांचा प्रमाणपत्र,पुष्प देऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.)डॉ.अविनाश गोटे यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक