अवयवदान अभियाना निमित्त रॅलीचे उद्घाटन

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30 ऑगस्ट  2016                                                 वृत्त क्र.560

अवयवदान अभियाना निमित्त रॅलीचे उद्घाटन



अलिबाग दि.30 :-  अवयवदाना विषयी जनजागृती व्हावी व अवयव दान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे या उद्देशाने राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत अवयवदान महा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने आज रायगड जिल्हयात अलिबाग येथे जिल्हा रुग्णालया तर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा श्रीमती सुरक्षा शहा यांच्या हस्ते हिरवा  झेंडा दाखवून करण्यात आले. या रॅलीची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून करण्यात आली.  अलिबाग शहराच्या विविध भागातून रॅलीचे मार्गक्रमण झाले.  या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.एस.नागावकर,जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थीनी तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक