ई-स्कॉलरशिप पोर्टल नव्याने सुरु



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन इत्यादी योनजेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे हे http://mahaeshol.Maharashtra.gov.in  संकेतस्थळ स्थगित करण्यात आलेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने,  इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी आत ई- स्कॉलरशिप  हे संकेतस्थळ 21 नोव्हेंबर पासून पुन्हा मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी दि.31 मार्च पर्यंत सन 2016-17 साठी दि.31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतु ज्यांना अद्याप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन यांचा लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी या पुनरुजीवतत करण्यात आलेल्या संकेतस्थळावरुन दि.21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत.
            याबाबत सविस्तर सूचना असलेले परिपत्रक आणि वेळापत्रक हे विभागाच्या  www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
तरी शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले सन 2015-16 व 16-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण रायगड यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक