उरण शहरासाठी प्राप्त 56 कोटींच्या विशेष अनुदानातून विकासकामांचा ना. चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ



            अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)-  उरण शहर स्मार्ट सीटी बनविण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.त्या अश्वासनाची पुर्तता करण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण निधीतून 56 कोटींचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. त्या अंतर्गत विविध विकासकामांचा आज राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उरण येथे शुभारंभ करण्यात आला.
 यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, मुख्याधिकारी संदीप खोमणे, शिक्षणमंडळ सभापती रवी भोईर जयविन कोळी कौशिक शहा पी पी खारपाटील यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांच्या माध्यमातून उरण नागरपरिषदेला हे विशेष 56 कोटींचे अनुदान मिळाले आहे.  यावेळी बोलतांना ना. चव्हाण म्हणाले की,  विकासकामे करताना दुरदृष्टी ठेवून कामे करावी, जेणे करुन त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहिल.  यानिधीतून शहरातील रस्ते, टाऊन हॉल व विमला तलाव सुशोभिकरण करण्यात  येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभिप्रेत असलेला देश घडविण्याचे काम होत आहे. उरण नगरपरिषदेच्या अधिकाधिक विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमास उरण शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक