वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी उलगडले आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग



अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शालेय विद्यार्थी वाचकांनी ' माझे आवडते पुस्तक' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग उलगडले.  शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातून प्रत्येक तालुक्यातून निवडक विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  बोलावण्यात आले होते.  यात सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे अंतरंग उपस्थितां समोर उलगडून दाखवले. यातून विद्यार्थ्यांच्या चौफेर वाचनाचा प्रत्यय उपस्थितांना आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकात श्यामची आई, अग्निपंख,  भगवत गिता यासारख्या विविध विषयांवरील पुस्तकांची  माहिती उपस्थितांसमोर कथन केली. या स्पर्धेत 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विजेत्या विद्यार्थ्यांची नावे या प्रमाणे-  प्रथम क्रमांक सिमरन निलेश नाईक, आरसीएफ स्कूल कुरुळ
द्वितीय क्रमांक श्रृती भरत म्हात्रे आरसीएफ स्कूल कुरुळ, तृतीय क्रमाक  प्रणोती किशोर अनुभवणे सेंट मेरी स्कूल चेंढरे, उत्तेजनार्थ सर्वेश निवासभळे, जे.एम राठी विद्यालय रोहा.
निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे-  प्रथम क्रमांक निवास पांडुंग थळे, रोहा
 द्वितीय क्रमांक सारीका बाळकृष्ण पाटील,  तृतीय क्रमांक- प्रगती विजय मणेर, धामणी ता. खालापूर
उत्तेजनार्थ  श्यामल बाळाराम पाटील,  कमळपाडा, शहाबाज.
मयुरी अशोक खोत, अलिबाग, सौ. स्वप्नाली सचिन पाभरे, कुरुळ,
 या स्पर्धांसाठी प्रकाश पाटील रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे विश्वस्त,  रायगड जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे सचिव विपीन राऊत  यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
जि.प.अध्यक्षांचे विद्यार्थ्यांशी हितगुज
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा सुरु असतांना जिल्हा ग्रंथोत्सवास  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती आदितीताई तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतःच्या वाचन संस्कारांविषयी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांसाठी व उपस्थितांसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरला.
 यावेळी आदितीताई तटकरे  म्हणाल्या की,  ग्रंथाशिवाय जीवन विकास शक्य नाही. आपल्या आजी व वडीलांमुळे मी  वाचनाकडे वळले, या संदर्भात दाखला देताना त्यांनी  मृत्युंजय या कादंबरीचे उदाहरण दिले आणि त्यातील ओघवत्या लेखन शैलीचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या क्षेत्रात आपल्या गावाला येऊन काम निश्चित करा, योगदान द्या. मला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आनंद होत असून आपल्या वडिलांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दी मागेही  ग्रंथांचेच अनन्यसाधारण महत्व असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून  सांगितले. वाचनाची आवड जोपासताना भाषेचा अडसर येतो पण इच्छा शक्ती असेल तर आपण त्यावर मात करू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी त्या आपल्या बालपणाच्या रम्य आठवणीत रममाण झाल्या होत्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक