अन्न पदार्थ व्यावसायिकांना आवाहन :परवाना नोंदणी व नुतनीकरण बंधनकारक



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:- रायगड जिल्ह्यातील सर्व किराणा, घाऊक विक्रेते,वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक,हॉटेलचालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉप धारक, दुध,मास विक्रेते,अन्न् पदार्थ वाहतुकदार व इतर अन्न पदार्थ व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 नुसार परवाना अथवा नोंदणी  करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे, तरी अन्न पदार्थ व्यावसायिकांनी परवाना नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन दि.तु.संगत, पेण यांनी केले आहे.
विना परवाना अथवा नोंदणी व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. उत्पादक,वितरक व घाऊ विक्रेते यांना परवाना अट क्र.14 नुसार विमा परवाना अथवा नोंदणी धारकास अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा विना परवाना अथवा नोंदणी धारकाकडून अन्न पदार्थांची खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे  परवाना घेतलेल्या ज्या अन्न व्यावसायिकांची परवाना मुदत 31 डिसेंबर 2017 पर्यंत संपूष्टात येत आहे अशा सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना चे नुतनीकरणासाठी योग्य त्या शुल्कासह दि.30 नोव्हेंबर 2017 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर नुतनीकरणासाठी आलेले अर्जाबाबत अन्न सुरक्षा व मानदे  नियमन (परवाना व नोंदणी)2011 अंतर्गत नियमन 2.1.7(4) नुसार दर दिवशी शंभर रुपये इतके  अतिरिक्त विलंब शुल्क आकारले जाईल.
सर्व व्यावसायिकांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाने परवाना अथवा नोंदणीकरीता ऑनलाईन सुविधा नवीन परवाना अथवा नोंदणी करीता योग्य त्या कागदपत्रासह नुतनीकरणाकरीता www.foodlicensing.fssai.gov.in  या  संकेत स्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच परवाना शुल्क भरुन शुल्क भरल्याबाबतची प्रत नुतनीकरणाच्या अर्जासोबत www.mahakosh gov.in या संकेतस्थळावर सादर करावी.
अधिक माहितीसाठी प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 1800222365 अथवा 02143-252085 कार्यालयीन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)अन्न  व औषध प्रशासन दि.तु.संगत, पेण यांनी केले आहे.
०००००



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक