मतदार नोंदणीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण :कार्यक्रमात सहस्त्रक मतदारांची होणार नोंदणी :निवडणूक साक्षरता क्लबही स्थापन करणार



निवडणूक साक्षरता क्लबही स्थापन करणार
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22:-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सहाय्यक मतदार नोंदणी अभियान आणि निवडणू साक्षरता क्लब हे दोन विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.
या  अभियानासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अलिबाग शहरातील जे.एस.एम. महाविद्यालय, पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी,जा.र.ह.कन्या विद्यालय,जन.अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग येथील प्रतिनिधी उपस्थित होते.
सहस्त्रक मतदार नोंदणी अभियानात ज्या मुला-मुलींचा जन्म या सहस्त्रकाच्या
 प्रारंभी म्हणजेच 1 जानेवारी 2000 रोजी  झाले आहे ते येत्या 1 जानेवारी 2018 या दिवशी वयाचे 18 वर्षे पूर्ण करीत आहेत.  अशा सहस्त्रक मतदारांचा या निमित्ताने शोध घेऊन त्यांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. अशा सहस्त्रक  मतदारांचा 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी मतदार  ओळख कार्ड देऊन सत्कार करण्यात येईल.
तसेच मतदारांची निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी हे या साक्षरता क्लबचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. याक्लबद्वारे निवडणूक विषयक माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी  मास्टर प्रशिक्षकांची निवड करुन त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक