जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा घेवून संपन्न झाला कार्यक्रम

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे आज  दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे  या संकल्पनेसह दि.06 ऑक्टोबर 2021 ते 01 नोव्हेंबर 2021 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळै, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  उपस्थित सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील प्रतिज्ञा घेतली तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचनही करण्यात आले.            

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक