एचआयव्ही/एड्स जनजागृतीविषयी रोहा येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त INDIA @७५ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग व को. ए. सो. डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य व सौ. के. जी. ताम्हाणे कला महाविद्यालय, रोहा राष्ट्रीय सेवा योजना विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर 2021  रोजी  सकाळी 11. 30 वाजता डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, रोहा  येथे जिल्हास्तरावरील  एचआयव्ही/एड्स विषयी  Quiz competation  (प्रश्नमंजुषा) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

         तरी प्रत्येक महाविद्यालयातील रेड रिबन क्लबमधील दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, आयोजित करण्यात आलेल्या   एचआयव्ही/एड्स विषयी  Quiz competation  (प्रश्नमंजुषा) स्पर्धेमध्ये जिंकणा-या रेड रिबन क्लबच्या टीम करीता प्रथम पारितोषिक  रु. ५०००/-   व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पारितोषिक  रु. २०००/-   व प्रशस्तीपत्रक, तृतीय पारितोषिक रु. १०००/-   व प्रशस्तीपत्रक या पध्दतीने बक्षीस देण्यात येणार आहे  तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक रेड रिबन क्लबमधील विद्यार्थ्यांना जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

          तरी  डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, रोहा  येथे जिल्हास्तरावरील  एचआयव्ही/एड्स विषयी  Quiz competation  (प्रश्नमंजुषा) या स्पर्धेकरीता प्रत्येक महाविद्यालयातील रेड रिबन क्लब मधील २ विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होवून ही स्पर्धा यशस्वी करावी,  तसेच अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क -  श्री. संजय ज्ञा. माने, मोबाईल नंबर 7798087999,  प्रा. मोकल , रायगड जिल्हा समन्वयक, मोबाईल नंबर 9850253267. प्रत्येकाने आपली एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीकरिता १०९७ या टोल  फ्री क्रमांकावर फोन करावा अथवा NACO APP  डाउनलोड करा अथवा नजीकच्या सरकारी रुग्णालयातील किंवा सरकारमान्य आयसीटीसीशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक