मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर 2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण या कार्यालयामार्फत तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे कामकाज प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असते. कोविड काळातील दुसऱ्या लाटेत वाढती रुग्ण संख्या व शासनाच्या वेळोवेळी आदेशान्वये माहे मार्च 2021 पासून शिबीर कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. 

        आता या शिबीर कार्यालयाचे कामकाज माहे नोव्हेंबर 2021 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम  पुढीलप्रमाणे-

      मंगळवार, दि.11 नोव्हेंबर व दि.सोमवार दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी ता. महाड.  शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी ता.रोहा. गुरुवार, दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी ता.मुरुड.  बुधवार दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी ता.माणगाव. बुधवार, दि.10 नोव्हेंबर 2021 व मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021  रोजी ता.श्रीवर्धन.  शुक्रवार, दि.26 नोव्हेंबर2021 रोजी ता.अलिबाग. 

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक