“मिशन युवा स्वास्थ्य” कार्यक्रमांतर्गत जे.एस.एम.महाविद्यालयात सुरु असलेल्या कोविड-19 लसीकरण अभियानास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली भेट

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भेट देवून महाविद्यालयातील युवक-युवतींनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे व मिशन युवा स्वास्थ्य यशस्वी करावे, असे आवाहन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या लसीकरण अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.निदा थत्ते, राजाराम हुलवान, सिस्टर  इंचार्ज उषा वावरे, स्टाफ नर्स सई थळे, ऐश्वर्या थळे, ऋतिक चोगले तसेच महाविद्यालयातील डॉ.जयश्री पाटील, डॉ.सोनाली पाटील, डॉ.पी.बी.गायकवाड, डॉ.आचार्य, डॉ.मिनल पाटील, डॉ.मोहसीन खान, डॉ.सुनिल आनंद, प्रोफेसर जयेश म्हात्रे, प्रो.शिल्पा कावळे, प्रो.प्रमोद हिवरे, प्रो.श्वेता पाटील, प्रो.सुनिल ठोकळे, प्रो.रविंद्र चिखले, राम रोकडे, जी.के.गिते, आर.के.शेलार हे प्रयत्नशील आहेत.    

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आरोग्य खात्याच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात "मिशन युवा स्वास्थ्य अभियान' दि. 25 ऑक्टोबर 2021 ते दि.2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात येणार आहे. दि.20 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत व पुढील सत्रातही महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू राहण्याचे संकेत आहेत. शासनाच्या व मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 लमीचे दोन डोस घेतले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अजूनही कोविङ-19 लस घेतलेली नाही असे सर्वेक्षणावरून आढळून आले आहे.

"मिशन युवा स्वास्थ्य' कार्यक्रमाच्या अंतर्गत अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयातही दि. 25 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. 18 वर्षावरील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लस घेतली नाही तसेच या कालावधीत जे विद्यार्थी दुसरा डोस घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. पुढील सात दिवस हे अभियान सुरु राहणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले आहे.

लसीकरणासाठी येताना विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल तसेच आपले ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही ओळखपत्र सोबत आणावे. येताना मास्क घालून यावे, सुरक्षित अंतर ठेवावे, असेही आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागात हे अभियान विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. ए.व्ही. जाधव (7721813636) व प्रा. पी.डी. दातार (9422494583) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक