स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महा बँक कर्ज मेळावा संपन्न 24 गटांना 63 लाख रकमेचे कर्ज वितरित

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका):- स्टेट बँक ऑफ इंडिया आणि  जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रायगड अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  नुकताच महाबँक मेळावा घेण्यात आला.

  या महाकर्ज मेळाव्यामध्ये   24 गटांना 63 लाख रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले व विविध प्रकारचे वैयक्तिक कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. उज्वला बाणखेले, जिल्हा विकास व्यवस्थापक श्री एस.एस. रघवतान, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, एल. डी.एम. रायगड श्री.विजय कुलकर्णी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक श्री. प्रकाश तांबे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक श्री. कुमार परिमल प्रेम, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक श्री. विपीन कुमार पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या मान्यवरांनी सर्व समूहातील महिलांना अतिशय महत्त्वाच्या अशा  योजनांची माहिती व त्याबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास BMMU अलिबाग कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक सौ. रुबिना, प्रभाग समन्वयक वर्षा म्हात्रे, अमोल माळी, साईनाथ पाटील हे उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक