सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत

 


अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78, 78 अन्वये विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्याबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

              महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ, 78, 78 अन्वये विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी शासनातील राज्य शासनाचे गट अ व ब प्रवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी/मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (एच.डी.सी) धारक/चार्टड अकाऊंटंट (सी.ए.) /इन्स्टिटयूट ऑफ कास्ट अँड वकस अकाउंटंट (आय.सी.डब्ल्यु.ए.) /कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), सहकार खात्यातील प्रशासन/ खापरिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक (किमान 5 वर्ष अनुभव) कायद्याची पदवी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

            अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- पदवी प्रमाणपत्र आणि जी.डी.सी.अँड अे प्रमाणपत्र, वकील असल्यास सनद प्रमाणपत्र,  संगणकीय ज्ञान असलेबाबत प्रमाणपत्र, केवायसी नॉर्मस- जन्म दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो इ., अनुभवाचा तपशिल संस्थेचे नाव, कामकाजाचा तपशिल पद व कालावधी (पद, कामाचे स्वरुप इ.)अर्जाचे विहित नमुने दि. 01 नोव्हेंबर 2021 पर्यंत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे/पालघर/रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग व त्यांचे अधिनस्त तालुका कार्यालयात, कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.

             रायगड जिल्ह्यातील पॅनल संदर्भात सादर करावयाचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड अलिबाग, शुक्रतारा बिल्डिंग, कामत आळी,सत्कार प्रेससमोर, अलिबाग  या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक