जिल्हा अग्रणी बँक तर्फे दि.27 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे महाकर्ज मेळाव्याचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी  बँक, बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे बुधवार, दि. 27 ऑक्टोबर  2021 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत रॉयल गार्डन, कर्जत, ता.कर्जत येथे भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

              या कर्ज मेळाव्यात कर्जत शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँका सहभागी होणार आहेत. तसेच  कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज आणि विविध गृह कर्ज, वाहन कर्ज व  शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि कर्जत नगर पालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज,  नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या  योजनेंर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत .

             त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 35 टक्के अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज तसेच नाबार्ड चे कृषी पायाभूत कर्ज याबाबत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

               याकरिता लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :- अर्ज, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड, छायाचित्र, बँक पासबुक  इत्यादी  कागदपत्रे घेऊन आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे, त्या स्टॉलवर आपल्याला संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन मिळेल.

            कर्जतमधील सर्व बँका एकाच छताखाली एकत्र येत असून कर्जत परिसरामधील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले व्यवसाय वृंध्दिगत करावेत, असे आवाहन  जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी  यांनी  केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक