“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत श्रीवर्धन मध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छता जनजागृतीपर सायकल रॅली संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :-माझी वसुंधरा अभियानांतर्गत श्रीवर्धन मध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छता जनजागृतीपर सायकल रॅली चे आयोजन माझी वसुंधरा अभियान हे  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासनाने दि. 14 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी,आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांचे गुणवत्तापूर्ण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी या अभियानांतर्गत करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार व मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.30 वाजता श्रीवर्धन नागरपरिषदेमार्फत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.

 या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धन, प्लास्टिक मुक्त शहर, कचरा मुक्त शहर, प्रदूषण मुक्त शहर या बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत सामुदायिक शपथ घेण्यात आली. सायकल रॅली ची सुरुवात श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालयापासून करण्यात आली व पुढे   छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्केट, प्रभू आळी, नारायण पाखाडी , गंधरे नाका, विठ्ठल आली, जीवनेश्वर कुंड, जीवना बंदर, महेश्वर पाखाडी , ओजाले पाखाडी, केलस्कर पाखाडी, सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन समुद्र किनारा, टिळक रोड मार्गे श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय असा प्रवास करण्यात आला. शेवट श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय येथे करण्यात आला. या सायकल रॅली मध्ये एकूण 55 सायकलस्वारांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड