“युवा संवाद-भारत @ 2047” कार्यक्रमातील सहभागासाठी इच्छुक समुदाय आधारित संस्थानी अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग,दि.17(जिमाका):- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव-स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करीत आहोत. पंतप्रधान श्री.मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंच-प्राण-मंत्र ची घोषणा केली होती.   अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक या संदर्भात युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) दि.1 एप्रिल 2023 ते दि.31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) युवा संवाद-भारत @ 2047 या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

 जिल्ह्याच्या विविध CBOs (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि साहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. जे पंच-प्राण-मंत्र अनुरूप देशाचे भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, जिल्हा नेहरु युवा केंद्रासोबत काम करतील, अशी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती. हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तज्ञ, जाणकार व्यक्ती सहभागी असतील.

 जे पंच-प्राण-मंत्र वर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान 500 तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरे एक सत्र होईल.  आयोजक समुदाय आधारित संस्था (CBO) ला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रु.20 हजार पर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. ज्या समुदाय आधारित संस्था अर्ज करू इच्छितात, त्यांचा गैर-राजकीय, पक्ष:पाती नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संबंधित संस्थेविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त 3 समुदाय आधारित संस्था निवडल्या जातील. निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक समुदाय आधारित संस्थांनी (CBOs) नेहरू युवा केंद्र सार्थक बंगला, श्रीबाग नं.2 येथे अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी qnykalibag@gmail.com या ई-मेलवर किंवा मो.9634243075 वर संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक