अल्पसंख्याक उमेदवारांकरिता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण गरजू उमेदवारांनी प्रवेशासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांशी संपर्क साधावा

 

अलिबाग,दि.13(जिमाका) :- शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत मुंबई विभागामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर 67 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासनातर्फे अल्पसंख्याक लोकसमूहातील युवक व महिला यांना अल्पमुदतीचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणास प्रवेश उपलब्ध आहेत.

     या अंतर्गत मुंबई विभागातील एकूण 36 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे, असे सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी कळविले आहे.

       विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था :- मुंबई शहर जिल्हा-मांडवी, दादर (मुलींची) लोअर परेल, मुंबई-11, मुंबई उपनगर जिल्हा-कुर्ला, नेहरूनगर कुर्ला (चांदीवली), बोरीवली, मुलुंड,  ठाणे जिल्हा- शहापूर, ठाणे (मुलींची), अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड,  पालघर जिल्हा-जव्हार, वाणगाव, रायगड जिल्हा- महाड, माणगाव, पनवेल, पोलादपूर.  रत्नागिरी जिल्हा-चिपळूण, दापोली, गुहागर, लांजा, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर,  सिंधूदुर्ग जिल्हा- देवगड दोडामार्ग, मालवण, फोंडाघाट, सावंतवाडी, वेंगुर्ला.

       अल्पसंख्याक लोकसमूहातील (मुस्लिम,जैन,ख्रिश्चन,नवबौद्ध,पारसी,शिख) युवक व महिलांकरिता औद्योगिक आस्थापनांना आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार संबंधित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण निःशुल्क देण्यात येणार आहे.

      या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमानुसार इयत्ता 5 वी ते 12 वी उत्तीर्ण अशी आहे.

      तरी गरजू उमेदवारांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांशी प्रवेशासाठी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक