110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहीर लिलाव आंबा फळांच्या लिलावामध्ये इच्छूक संस्था/व्यक्तींना सहभागी होण्याचे आवाहन

 

 

     अलिबाग,दि.13(जिमाका) :- अलिबाग  तालुक्यातील तालुका फळरोपवाटीका आवास या शासकीय फळरोपवाटिकेतील 110 आंबा मातृवृक्षावरील आंबा फळांचा जाहीर लिलाव बोली पध्दतीने मंगळवार, दि.24 मार्च 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित  करण्यात  आला आहे.

      फळबाग व लिलाव संबंधी अटी व शर्ती तालुका फळरोपवाटिका, आवास, ता. अलिबाग या शासकीय फळरोपवाटिकेच्या कार्यालयात शासकीय सुट्टीचा दिवस वगळून आजपासून पाहावयास मिळतील.

       तरी इच्छूक संस्था/व्यक्तींनी लिलावाच्या दिवशी शासकीय फळरोपवाटिकेवर हजर राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक