जिल्हा क्रीडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरभी स्वयंसेवी संस्था, माणुसकी प्रतिष्ठान व रायगड प्रिमियर लिग आयोजित अलिबाग तालुका शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी “कला व क्रीडा महोत्सव 2023” जाहीर

 


अलिबाग,दि.17(जिमाका):- स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने अलिबाग तालुक्यातील विविध शाळेमधील व वैयक्तिक विद्यार्थीसाठी क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. क्रीडा व पारंपारिक सांस्कृतिक कलांचे जतन करून, विविध क्रीडा प्रकारातील क्रीडांसाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढे वाव मिळण्यासाठी 19 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अलिबाग तालुका कला आणि क्रीडा महोत्सवाचे दि.18 मार्च ते दि.20 मार्च 2023 रोजी या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रायगड प्रिमियर लिग आणि माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र यांच्या तर्फे सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित केला जाणार आहे.

 या महोत्सवासाठी आ.सी.एफ थळ यांचे प्रायोजकत्व तसेच विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यासाठी विशेष करून मैदानी खेळांचे 200 मीटर 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, कबड्डी, कुस्ती, पासिंग व्हॉलीबॉल, सायकलिंग, खो खो, फूटबॉल, लाठीकाठी आणि बुध्दिबळ तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्याने प्रसार होत असलेल्या महिला (19 वर्षांखालील) लेदर बॉल क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा कार्यक्रम आर.सी.एफ कुरुळ येथील क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस कार्यालयाचे मैदान, नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल आणि महिला लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा खानाव येथे होणार आहेत.

या स्पर्धांना रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचीही सहमती मिळाली आहे. स्पर्धेचे स्वरुप आणि नियम लवकरच कळविण्यात येणार असून सर्व सहभागी खेळाडूंना, शाळांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असल्याने ज्या शाळेतील विद्यार्थी जास्त पदके  मिळवतील, त्या शाळेला स्पर्धा  विजेतेपदाचा चषक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे निमंत्रक माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान आणि उपाध्यक्ष-रायगड प्रिमियर लिग श्री.जयंत नाईक, कार्योपाध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असो. आणि सचिव रायगड प्रिमियर लिग, श्री.संदीप वारगे, जिल्हा समन्वयक रायगड जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

पहिली अलिबाग तालुका कला आणि क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध खेळांतील कौशल्य प्राप्त नामवंत प्रतिनिधी, खेळाडू, अलिबाग तालुक्यातील क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा संस्था विशेष मेहनत घेणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था आणि क्रीडा प्रेमींचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक