डाक विभागाच्या निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी रायगड, नवीमुंबई विभागासाठी दि.16 सप्टेंबर रोजी डाक अदालतचे आयोजन डाक अदालतीचा लाभ घेण्याचे जिल्हा डाक अधीक्षक डॉ.संजय लिये यांचे आवाहन

 


अलिबाग,दि.16(जिमाका):-डाक विभागाच्या कुटुंब निवृतीवेतनधारक व निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन यांच्यामार्फत पेन्शन अदालत शुक्रवार दि.16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 वा.पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफीस इमारत पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये निवृत्तीधारकांच्या वेतन व इतर लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा या डाक आदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे या अदालती मध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशन कडून आलेल्या प्रकरणावर ही या अदालती मध्ये निर्णय घेता येत नाही. तक्रारदाराने अर्ज करताना निवृत्तीधारकांचे नाव, हुद्दा, जिथे निवृत्त झाले त्या कार्यालयाचे नाव, निवृतीची तारीख, पीपीओ क्रमांक, पोस्टऑफिसचे नाव जिथून पेन्शन घेतली जात आहे, पोस्टाचा पत्त्ता, दूरध्वनी क्रमांक, थोडक्यात तक्रार, पेन्शनकर्त्याची सही, दिनांक अशा पद्धतीने अर्ज करावा. पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालयाकडून अशी अदालत प्रतीवर्षी आयोजित केली जाते.

या पेन्शन अदालतीचा हेतू पेन्शन धारकांच्या समस्या वेगवान व प्रभारितीने विनाविलंब सोडवणे हा आहे. या डाक अदालती मधून डाक विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांना असणाऱ्या समस्यावर, तक्रारीवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तक्रारदारांनी आपला अर्ज दिलेल्या माहिती नुसार वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरारा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत पनवेल, ता.पनवेल,जि. रायगड 410206 या पत्त्यावर दि.26 ऑगस्ट 2022 पर्यंत मिळतील अशा रीतीने पाठवावेत. त्यानंतर आलेल्या प्रकरणाचा अंतर्भाव या अदालती मध्ये केला जाणार नाही. संबधित व्यक्तींनी या डाक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्हा डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी केले आहे.  

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक