पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक महिला बचतगटांनी अर्ज करावेत


अलिबाग,दि.18 (जिमाका):- पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून महिला बचतगटाकडून उपहारगृह चालविण्यात यावेत, असे शासन निर्देश आहेत.

यानुषंगाने नोंदणीकृत असलेल्या महिला आर्थिक विकास मंडळ व महिला बचतगटाच्या नोंदणीकृत असलेल्या संस्थांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथून बातमी प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसाच्या आत निविदा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य व्ही.डी.टिकोले यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक