जागतिक सामाजिक न्याय दिवस 2023 उत्साहात साजरा


अलिबाग,दि.21(जिमाका):- पनवेल तालुका विधी सेवा, समिती व तहसील कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल येथे जागतिक सामाजिक न्याय दिवस न्यायाधीश श्री.जयराज वडणे, (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश,पनवेल) यांच्या विशेष उपस्थितीत (दि.20 फेब्रुवारी 2023) रोजी संपन्न झाला.

       याप्रसंगी पनवेल नायब तहसिलदार श्री.विनोद लचके, , लोकपरिषद सामाजिक संस्था व आश्रय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अशोक गायकवाड, उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस श्री.संतोष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

      याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश श्री.जयराज वडणे  म्हणाले की, भेदभाव विरहीत जगामध्ये जगणे आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे. लिंगभेद, वर्णभेद इत्यादी पलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जोपासना होणे खूप महत्वाचे आहे.

        सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शेवटच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

       या कार्यक्रमास पनवेल बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांसह  ॲड.धनराज तोकडे, ॲड. प्रगती माळी, ॲड. भूषण म्हात्रे, ॲड.छाया म्हात्रे, पॅनल ॲड. स्वाती सोनवणे, वरिष्ठ लिपिक सौ. सुजाता महाडिक आणि P.L.V. शैलेश कोंडसकर तसेच लोक परिषद सामाजिक संस्थेच्या महिलांच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या पंधराहून अधिक महिला प्रतिनिधी, युवा संस्थेचे प्रतिनिधी हृषीकेश, कचरा वेचक महिला, आदिवासी महिला, घरकाम करणाऱ्या महिला इत्यादी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गरजू महिला उपस्थित होत्या.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक