कलापथकाच्या माध्यमातून एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- एच.आय.व्ही एड्स आणि गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष रायगड- अलिबाग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था,रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 व दि.24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत एड्स बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 

 दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता रोहा बस स्थानक, सकाळ 11 वाजता एल.अँड.टी कॉलनी, नागोठणे व सायंकाळी 4 वाजता सुधागड पाली आणि दि. 24 फेब्रुवारी रोजी ठीक सकाळी 10 वाजता एस.टी स्टँड, माणगाव  व सायंकाळी 4.00 वाजता लोणेरे फाटा येथे कलापथकाच्या सादरीकरणाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग, शासकीय रुग्णालयातील आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र येथील सहकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने व स्वयंसिद्धा सामाजिक विकास  संस्थेच्या वतीने सुचिता साळवी यांच्याकडून करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक