सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


रायगड, दि.31 (जिमाका):-  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल  यांच्या जयंतीनिमित्त व  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.

        सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय एकता दिवस' निमित्त यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथही देण्यात आली.

        याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, तहसिलदार (सर्वसाधारण) उमाकांत कडनोर जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक