महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हयातील विदयार्थ्यांना टॅबलेटचे वितरण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते कार्यक्रमात वाटप



रायगड,  (जिमाका) दि. २:--जिल्हयातील जेईई, नीट, एमएचटी-सीईटी (JEE/NEET/MHT-CET) चे प्रशिक्षण घेणा-या  विदयार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हयातील जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( महाज्योती) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज केले. 


  जिल्हाधिकारी कार्यालय रायगड - अलिबाग, राजस्व सभागृह येथे  आज कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी विदयार्थी व पालकांशी संवाद साधला .महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणा-या रायगड जिल्हयातील १३ विदयार्थ्यांना  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते टॅबलेट व डाटा सीम यांचे वाटप करण्यात आले. 


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे मार्फत ( महाज्योती) JEE/NEET/MHT-CET च प्रशिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सीमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येतेे. 

आजच्या कार्यक्रमात एकूण १३ विदयार्थ्यांना टॅबलेट व डाटा सीम वाटप करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महाज्योती संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आलेे. 


सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड सुनिल जाधव यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  यावर्षी यापूर्वीही दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हयातील ५ विदयार्थ्यांना व मागील वर्षी ५० विदयार्थ्यांना टॅबलेट वाटप करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  सुनिल जाधव यांनी दिली आहे.


सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील श्रीमती मंदाकिनी पाटील समाज कल्याण निरीक्षक यांनी केले व श्रीमती राजश्री म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक