धार्मिक अल्पसंख्यायक शाळांनी अनुदानासाठी अर्ज करावेत



अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.04 : रायगड जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक शाळांनी पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळण्याकरीता अर्ज करावेत. अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी शासनाकडून दि.30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे.
तरी दि.30 नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत आपले प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकरी कार्यालय, रायगड-अलिबाग यांचेकडे सादर करावेत असे आवाहन श्री.सुनिल जाधव जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक