मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा



अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) – भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दि.6/11/2019 ते 8/11/2019 पर्यंत उत्तर कोकणासह, उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील सूचनेत कळविण्यात आले आहे. त्याबाबत योग्य त्या उपाय योजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व जिल्हा यंत्रणेस सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असे ड्युटी ऑफिसर मंत्रालय, नियंत्रण कक्ष मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड