नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे - प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे




अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावीत अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी महा चक्रीवादळ पूर्वतयारी व उपयोजना  प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी सर्व विभाग प्रमुखांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या. सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत याची खात्री करावी, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलविण्यात यावे. पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये. तसेच मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी. मासेमारी जेट्टींवर सूचना फलक लावण्यात यावेत. बोटींमधून प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवासी वाहतूक थांबविण्यात यावी. प्रवासी बोटीवर जीवनावश्यक लाईप जॅकेट्स, बोयाज उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. सर्व बीचेसवरील वॉटर स्पोर्टस उपक्रम थांबविण्यात यावेत. पर्यटकांनी / नागरीकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. चक्रीवादळामुळे झाडे पडण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे चेन सॉ कटर, झाडे हटविण्यासाठीची जेसीबी इ. आवश्यक साधने तत्पर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. संपर्क व्यवस्थेसाठी वादळामुळे मोबाईलचे टॉवर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी संपर्क व्यवस्था उपलब्ध करावी. विद्युत पुरवठा-झाडे पडणे, पोल पडणे यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. अशावेळी योग्य मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध होईल याचे नियोजन MSDCL यांनी करावे. रुग्णवाहिका, हॉस्पीटलमधील आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तत्पर ठेवाव्यात. शासकीय रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णालयांमध्ये उपलब्ध राहतील. याची दक्षता घ्यावी. ज्या विभागाच्या अधिकारक्षेत्रात रस्ता/पूल येतो, त्या विभागांनी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. संबंधित विभागाची सर्वस्वी जबाबदारी राहील.  झाडे पडल्यामुळे/पाणी भरल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था, वाहतूक पोलीस कर्मचारी/स्वयंसेवक, झाड हटविण्यासाठी साहित्य तात्काह उपलब्ध होतील असे नियोजन करावे. शाळा, विद्यालय/ महाविद्यालयाच्या प्रशासनांना सर्तकतेचा इशारा देण्यात यावा. आवश्यकतेप्रमाणे शाळा, विद्यालये/ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे. घडलेल्या घटनांचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास सादर करावा. सखल भागात अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता राहील. त्या दृष्टीने योग्य त्या उपाय योजना कराव्यात. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी निवडलेल्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक