मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना


अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात होत असणाऱ्या व्यापक गुंतवणूकीमुळे सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी पुरक उद्योग व्यवसायाच्या अनेकविध संधी विविध क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. यास अनुसरुन राज्यातील होतकरु युवक/युवतींसाठी राज्याची सर्वसमावेशक स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मितीकार्यक्रम(Chief Minister Employment Generation Programme -CMEGP) योजना  नविन उद्योग धोरणाच्या अंतर्गत जाहीर करण्यांत आली आहे.
ठळक वैशिष्टये
एकूण 10,000 स्वयंरोजगारीत घटक प्रथम वर्षी स्थापित होतील, एकूण सुमारे 1 लाख घटक योजना कालावधीत पुढील पाच वर्षात स्थापित होतील. सुमारे 8 ते 10 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार संधी राज्यात योजना कालावधीत निर्माण होतील. योजना पूर्णत: ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धारीत कालावधीत प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. योजना उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल समिती कार्यरत राहील. जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय हे कार्यान्वय यंत्रणा आहेत. राष्ट्रीयकृत बँका तसेच प्रमुख खाजगी बँका यांच्या सहयोगाने सदर योजना राज्यात राबविण्यात येईल.
योजनेचे स्वरुप
कृषी व कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजने अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 10.00 लाख तसेच उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी रु. 50.00 लाख गुंतवणुकीचे प्रकल्प पात्र राहतील. राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यांत येईल. किमान 30 टक्के महिला लाभार्थी तसेच किमान 20 टक्के अनुसुचित जाती /जमाती लाभार्थी असतील. प्रथम वर्षी एकूण 10,000 इतके उद्दिष्ट ठरविण्यांत आले आहे.
आवश्यक कागदपत्रे
फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, प्रशिक्षण दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट, अपंग असल्यास त्या विषयीचा दाखला इ.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळावर सादर करावे. हेल्पलाईन  नं.18602332028/022-22023912
तरी जिल्हयातील सर्व सुशिक्षित बेरोजगार / रोजगाराच्या प्रतिक्षेत असणा-या सर्वांना महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग  यांचे वतीने आवाहन करणेत येते कि, सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग पत्ता- रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, ता-अलिबाग, जि-रायगड-402201 दूरध्वनी क्र. 02141-222099 येथे संपर्क साधावा.
000000
                  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक