उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, दि.29 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

सकाळी 8:10 वाजता मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता गेट वे ऑफ इंडिया (गेट नं. 4) येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9 वाजता बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड येथे आगमन व मोटारीने आक्षी, ता.अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता मराठी भाषा आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: ग्रामपंचायत आक्षी, ता.अलिबाग). सकाळी 9:50 वाजता आक्षी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादन संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 10:30 वाजता आंबेत पूल संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता दिवस मानवंदना संचलन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11:30 वाजता जनता दरबार (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). दुपारी 2:30 वाजता कार्यकर्त्यांच्या भेटी (स्थळ: तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग). दुपारी 3:30 वाजता तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथून मोटारीने सोगाव कडे प्रयाण. दुपारी 3:45 वाजता सौ.चंद्रकला कुमार कदम यांच्या स्टूडिओ व निवासस्थानी सदिच्छा भेट (स्थळ: पितृसावली, सोगाव, ता.अलिबाग, जि.रायगड) दुपारी 4:15 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. दुपारी 4:45 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व मोटारीने मंत्रालयाकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक