जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यू.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला जिल्हास्तर विजेता संघ

 

 

रायगड जिमाका दि.22:-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे आयोजन 15 वर्षाखालील मुले 17 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुली या वयोगटात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील (पनवेल मनपा वगळून) 32 संघांनी सहभाग घेतला साधारण 500 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे-15 वर्षाखालील मुले, प्रथम- हिरानंदानी ट्रस्ट स्कूल भोकरपाडा, द्वितीय- युएस चे इंग्लिश मीडियम स्कूल उरण, तृतीय- रेड क्लिप स्कूल उलवे

17 वर्षाखालील मुली- प्रथम- शिशु मंदिर खोपोली, द्वितीय- एम एन आर इंटरनॅशनल स्कूल पळस्पे, तृतीय- आर के एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा

17 वर्षाखालील मुले-प्रथम-यू ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल, उरण, द्वितीय-जनता विद्यालय खोपोली, तृतीय-सेंट वेल्फ्रेड हाईस्कूल शेडुंग

 या स्पर्धेत जोसेफ नदार, अहमद दादरकर, युवराज वाळवी, नमन कोळी, पल्लवी पाटील, मानसी पाटील, श्रावणी देशमुख, रिया गायकर, वेदांश कोळी, विपुल बर्गे, फरहान व समा या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंच साहिल कांबळे, नितेश जगताप, रितेश ठाकूर,  प्रथमेश पाटील,  देव साटोदे, विराज देशमुख यांनी रायगड जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी  ऋषिकेश साखरकर, धर्मेंद्र साटोदे, यतीराज पाटील, राकेश म्हात्रे, श्रीमती धनश्री गौडा आदींनी सहकार्य केले.

रायगड जिल्ह्यातील विजेते संघ आता नेरूळ, नवी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विभागीय स्पर्धेसाठी या संघांना अपर पोलीस अधीक्षक  अतुल झेंडे जिल्हा क्रीडा अधिकारी, राजेंद्र  अतनुर, श्रीम अंकिता मयेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक